लोकस्वराज्य आंदोलनाची मागणी…
हिमायतनगर प्रतिनिधी ( कृष्णा राठोड )औरंगाबाद शहरातील सिडको येथे एका दलित मागासवर्गीय मातंग समाजात राहणारा कै. मनेश शेषेराव आव्हाड वय २७ वर्षे हा युवक महानगरपालिकेच्या सभाग्रहाची व्यवस्था पाहण्यासाठी महिन्यांने राहत होता.या ठिकाणी बरेच दिवसांपासून महिन्याने काम इमानदारीपूर्वक करत असताना,येथील माजी नगरसेविका खरात यांच्या कुटुंबातील मंडळीकडे या सभाग्रहाची व्यवस्थापन करण्याची जबाबदारी होती.परंतु या ठिकाणी इमानदारीपूर्वक चोवीस तास काम करत असताना शुल्लक कारणावरून मंगल कार्यालयातील काही वस्तू चोरीला गेल्याच्या संशयावरून कै.मनेशआव्हाड यांच्यावर संशय घेऊन खरात कुटुंबातील राजकीय वलयप्राप्त गुंडांनी त्याला दिनांक २० एप्रिल २०२२ रोजी घरांमधून बोलावून तुला काम सांगायचे आहे,असे म्हणून त्याला सोबत घेऊन एकूण आठ ते दहा जणांनी हात पाय बांधून या गुंडांनी सांग तु चोरी केली आहेस? मान्य कर व चोरीचे साहित्य परत करअसे म्हणून लोखंडी राड,लाकडी बांबूनी त्याला एखाद्या जनावरांप्रमाणे बेदम मारहाण करण्यातआली होती.तर या मारहाणीचा सामाजिक माध्यमांवर व्हिडिओ करून तो व्हीडीओ प्रसारित करण्यात आले होते.या आठ ते दहा लोकांनी त्यांना बेदम मारहाण करत असताना अखेर त्यांचा जागीच मृत्यू झाल्यानंतर औरंगाबाद घाटी रुग्णालयात संबंधित आव्हाड यांना दाखल करून त्याठिकाणावरुन क्रूर राक्षसी गुंडांनी पळ काढला आहे. हे प्रकरण सामाजिक माध्यमातून प्रसारित व उघड झाल्यानंतर व या प्रकरणातील दोषी माजी नगरसेविका खरात यांच्या कुटुंबातील गुंन्डांवर कायदेशीर कलमे वाढून जलदगती उच्च न्यायालयात प्रकरण चालवुन त्यांना तात्काळ फाशीवर लटकवण्यात यावे,कारण पुन्हा महाराष्ट्रात असे दलित मातंग समाजातील युवक महिला, बांधवांवर घटना घडू नये, याची दक्षताऔरंगाबाद पोलीस प्रशासनानी यांनी घ्यावी.अतिशय गरीबअसलेल्या कुटुंबातील त्यांच्या पत्नीला आयुक्त महानगरपालिका औरंगाबाद यांनी कायमस्वरूपी महानगरपालिकेमध्ये शासकीय नौकरी देण्यात यावी व विशेष बाब म्हणून सामाजिक न्याय व सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाकडून तातडीची पंचवीस लाख रुपयांची आर्थिक मदत त्यांना सामाजिक न्याय मंत्री, पालकमंत्री औरंगाबाद यांनी द्यावी. तर संबंध महाराष्ट्रामध्ये दलित मातंग समाजातील युवक, महिला,मुलेंमुलीं, बांधव यांच्यावर दररोज अन्याय,अत्याचार,खून बलात्कार असे प्रकार वाढतच आहे. याकडे महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री,गृहमंत्री, सामाजिक न्यायमंत्री,पालकमंत्री, राज्यमंत्री यांनी लक्ष देऊन दररोज होणारा अन्याय,अत्याचार थांबवण्यासाठी ग्रहविभाग व पोलिस प्रशासनाने तात्काळ गुन्हे दाखल करून अशी प्रकरणे जलदगती न्यायालयासमोर नेवुन दोषींवर जास्तीत जास्त फाशी,जन्मठेप होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचे कडून संपूर्ण जिल्ह्यातसह हिमायतनगर तालुक्यात लोकशाही मार्गाने बेमुदत उग्रपणे धरणे आंदोलन, रास्तारोको अशी वेगवेगळी आंदोलने करून शासनाकडे कायदेशीर मागणी करण्यात येईल.असेही यावेळी निवेदनामध्ये मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य व गृहमंत्री,सामाजिक न्यायमंत्री यांना तहसीलदार तहसील कार्यालयामार्फत एका निवेदनाद्वारे आज दिनांक २७/४/२०२२ रोजी मागणी केली आहे. या निवेदनावर लोकस्वराज आंदोलन तालुकाध्यक्ष धोंडोपंत बनसोडे,तालुका उपाध्यक्ष आनंदराव जळपते,तालुका सचिव दिगांबर गायकवाड, युवकअध्यक्ष गजानन वाघमारे,कॉम्रेड शामरावजी गुंडेकर, गंगाधर गणपत गायकवाड सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार,गोविंद गोखले तालुका उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,गणेश राऊत जिल्हा उपाध्यक्ष बसपासह अनेक शेकडों विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्याचे सह्या आहेत.ही निवेदने नायब तहसीलदार अनिल तामसकर व भगवान कांबळे पोलीस निरीक्षक हिमायतनगर मार्फत संबंधितांस देण्यात आली आहेत.