👉 आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांचे प्रतिपादन
मारोती अक्कलवाड सवनेकर
दिनांक- 26 एप्रिल 2022
हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना येथील 25 एप्रिल रोजी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात अंदाजे दोन ते अडीच हजार पाहुण्यांची उपस्थित होती.
अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने, सर्वांच्या सहकार्याने या मेळाव्यात सर्व ग्रामस्थांनी काम केले आहे.
👉 वधुवरांना शुभेच्छा संदेशात आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर म्हणाले आजकालच्या धावपळीच्या जीवनात वेळ फार आहे. आणि गेल्या दोन वर्षांपासून कोरोणाचे संकट आल्यामुळे असे मेळावे शक्य नव्हते. पैश्याची बचत करायची असेल तर, अशा मेळाव्याची नितांत गरज असुन, काळजी गरज आहे. म्हणुन मी पुन्हा एकदा सर्व सवना वासीयांना धन्यवाद देतो. की ज्यांनी या मेळाव्याचे उत्तम केले आहे. असे शेवटी आमदार साहेबांनी सांगितले.
👉 आपल्या मुलाबाळांना शिक्षण शिकवा.
👉 बाबुरावजी कदम कोहळीकर
आज सवना येथील मेळाव्यात उपस्थित राहुन तुमच्या सर्वांची भेट झाली. मला एकच सांगायचे ईतर लग्न कार्यात अवांतर खर्च करु नका. अश्या मेळाव्याचे आयोजन करुन मेळाव्यात लग्न लावा. कमी खर्चात लग्न करुन उर्वरित खर्चात आपल्या मुलाबाळांना शिक्षण शिकवा असे प्रतिपादन बाबुरावजी कदम कोहळीकर यांनी वधुवरांना शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. यावेळी गावातील ग्रामस्थ, पाहुणे,मंडळी, महिला भगीनी सर्वच पक्षांचे नेते, कार्यकर्ते, पत्रकार, व्यापारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.