Home समाजकारण अपघातग्रस्त स्व.गौतम राऊत यास आर्थिक मदत…

अपघातग्रस्त स्व.गौतम राऊत यास आर्थिक मदत…

जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड
दिनांक-26 एप्रिल 2022

आज हिमायतनगर तालुक्यातील सवना (ज) येथे सार्वजनिक विवाह मेळाव्या मध्ये भारतीय जनता पार्टीचे बुथ प्रमुख विशाल अनगुलवार यांच्या विवाह प्रसंगी भारतीय जनता पार्टी नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी ह्या विवाह सोहळ्यास भेट दिली. काल हिमायतनगर रेल्वे स्टेशन येथे सवना(ज) येथील शेतमजूर गौतम गणपत राऊत हे नांदेड जाण्यासाठी चढत असताना, अचानक रेल्वे चालु झाल्यामुळे रेल्वेमध्ये चढण्याच्या गडबडीमध्ये त्यांचे हात घसरून ते रेल्वे मध्ये आले. त्यामुळे त्यांचे अपघाती निधन काल झाले. त्यांच्या घरी येत्या चार-पाच दिवसात त्यांच्या मुलीचा विवाह सोहळा आहे. पण काळाने त्यांच्यावर घाला घातल्यामुळे मोठी अडचण राऊत परिवार निर्माण झाली. याबाबत भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान यांनी जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांना सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने मौजे सवना येथे स्वर्गीय गणपत राऊत यांच्या घरी जाऊन त्यांची मुलगी उज्वला गौतम राऊत व परिवाराची भेट दिली. तातडीने आर्थिक मदत केली. तसेच या संदर्भात काही अडचण असल्यास आपण तातडीने आमच्या हिमायतनगर भाजपाचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान यांच्याकडे संपर्क करावे. असेही श्री व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी यावेळी राऊत परिवारास सांगितले. यावेळी प्रमुख उपस्थित ओबीसी जिल्हा चिटणीस अंबाराव संगनोड सोनारीचे सरपंच सुधाकर पाटील सोनारीकर, सवना नगरीचे संरपंच परमेश्वर गोपतवाड, अशोक अंनगुलवार शहाजी जाधव ठोणेकर राजेश्वर हंडे युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष राम सूर्यवंशी वामनराव मिराशे पाटील परशुराम विठलवाड कल्याण सिंग ठाकूर बंडु रामा राऊत दत्ता संगनवाड संतोष डांगे प्रमोद भुसाळे यावेळी उपस्थित होते

Previous articleरमणवाडी तांडा येथे तिव्र पाणी टंचाई. 👉 नागरीकांना शेतावरुन आणावे लागते पाणी..
Next articleसामुहिक विवाह मेळावे घेणे हि ‍काळाची गरज….