अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधी/ आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रयत्नाने गावातील मुख्य रस्त्याचे काम व कारला फाटा ते गावापर्यंत डांबरीकरण रस्त्यांचे काम अंतिम टप्प्यात आले असून ग्रामस्थांची रस्त्याच्या कामाची गेल्या अनेक वर्षांपासून ची मागणी पुर्ण झाली असल्याचे तंटामुक्तीचे अध्यक्ष डॉ गफार यांनी व्यक्त केले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील कारला ते गावापर्यंत च्या मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली होती. खड्डेमय रस्ता झाल्यामुळे नागरिक त्रासले होते. पुल खचून गेल्याने पावसाळ्यात नागरीकांना पुलावरून जाणे अवघड बनले होते. या मुख्य रस्त्याची मागणी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी लक्षात घेऊन या रस्त्यासाठी 80 लक्ष रूपये मंजूर केले होते.
गावातील सिमेंट रस्त्यांचे कामाचे भूमिपूजन शनिवारी सरपंच गजानन पाटील कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ गफार म्हणाले की सुर्यवंशी बंधू यांचे काम अतिशय दर्जेदार असुन गावातील देखील याच पध्दतीने काम झाले पाहिजे कारला ग्रामस्थांच्या अनेक वर्षाचा रस्त्याचा प्रश्न आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रयत्नाने अखेर सुटला आहे.
ग्रामपंचायत च्या दिड वर्षाच्या कार्यकाळात विकास कामानी उंचाक गाठला असून सरपंच, उपसरपंच सदस्य यांनी देखील विकासात्मक कामावर भर दिला असल्याने गावाची विकासाकडे वाटचाल सुरू झाली असल्याचे तंटामुक्तीचे अध्यक्ष डॉ गफार यांनी व्यक्त केले आहे. यावेळी सरपंच गजानन पाटील, प्रा. ज्ञानेश्वर घोडगे, दत्ता चिंतलवाड,सोपान बोंपीलवार, गजानन मिराशे, रामेश्वर यमजलवाड, ग्यानबा इटेवाड, लक्ष्मण ढाणके, इटेवाड, रामराव बर्लेवाड, धमा वाठोरे, नागेश कोंडेवाड यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.