संस्थेकडून आयोजित सदिच्छा समारोहात राजेश धुर्वे यांचे मनोगत
नांदेड नाबार्ड कार्यालयात सात वर्षापूर्वी श्री. राजेश धुर्वे जिल्हा व्यवस्थापक म्हणून रुजू झाले. यापूर्वी ही संस्थेचे नाबार्डशी असलेले संबंध पाहून त्यांनी संस्था भेट घेतली. ग्रामीण भागातील घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत धडपडणारी संस्था व कार्यकर्ते यांच्या सहवासाने व कामाने ते समाधानी होते. म्हणूनच त्यांच्या कार्यकाळात पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, शाश्वत विकास कार्यक्रम, वातावरण अनुकूल कार्यक्रम, शेतकरी उत्पादक कंपनी, महीला सक्षमीकरण, आर्थिक साक्षरता अभियान, कृषी उपयोगाचे प्रकल्प त्यांनी चालू केले. सगरोळी येथील नाबार्ड ने उभारलेला बाजारहाट हा अभिनव प्रयोग संपूर्ण भारतात गौरविण्यात आला.
नांदेड जिल्ह्यात नाबार्ड ची नव्याने ओळख करून देणारे जिल्हा विकास अधिकारी श्री राजेश धूर्वे यांचा सहाय्यक महाप्रबंधक म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल आज संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र सगरोळी येथे सपत्नीक सदिच्छा समारोह आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्ह्यातील नाबार्ड सहाय्य अशासकीय संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.
विविध शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या वतीने श्री. राजेश धुर्वे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष संस्थेचे संचालक श्री. रोहित देशमुख यांनी अध्यक्षीय समारोपप्रसंगी त्यांच्या कार्यकाळात अनेक गोष्टी नव्याने शिकण्यास मिळाल्या असे सांगत त्यांचे आभार मानले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.