Home कृषीजागर पिक कर्ज माफी न मिळाल्याने शेतकर्यांचा उपोषणाचा इशारा…

पिक कर्ज माफी न मिळाल्याने शेतकर्यांचा उपोषणाचा इशारा…

अंगद सुरोशे ता. प्रतिनीधी..शासणाकडुन राबविण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी व छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी या योजनेतून अनेक शेतकर्यांना वंचित ठेवण्याचा अघोरी प्रकार दिसुन आला अल्प भूधारक अनेक शेतकरी या योजनेतुन वगळल्यामुळे या शेतकर्यांच्या घरावर शासनाने जणु तुळशीपत्र ठेवण्याचे काम केल्याचे दिसून येते आसाच प्रकार उंचवडद ता. उमरखेड जि. यवतमाळ येथील शेतकरी नामे.शामराव देवराव लुम्दे,जयवंत संभाराव कदम,भिमराव गणपत कदम,वामन मारोती कदम, गणेश आनंदराव कदम, अशोक कामजी कदम हे शेतकरी यांचे दोन्ही योजनेत कर्ज माफी नाव समाविष्ठ असतांना सुद्धा या योजनेचा कुठलाही लाभ न मिळाल्याने या शेतकर्यांना शासनाच्या आडमुठी धोरणाचा चांगलाच फटका बसतांना दिसत आहे सदरील शेतकरी यांनी जिल्हा अधिकारी,उमरखेड, जि. पालकमंत्री, यवतमाळ, उपविभागिय साहेब कार्यालय उमरखेड, तहसिलदार साहेब उमरखेड, सहाय्यक निबंधक साहेब उमरखेड तसेच पोलिस स्टेशन कार्यालय या ठिकाणी लेखी स्वरुपात अर्ज करुन ही चुक प्रशासनाच्या शासकिय कर्मचारी यांची आसुन शासनाने आमच्यावर केलेल्या अन्यायावर तोडगा कढुन लवकरात लवकर आमची कर्ज माफी करून न्याय द्यावा अन्यथा येत्या 25/4/2022रोजी लोकशाही मार्गाने यवतमाळ जिल्हा म. बॅंक शाखा चातारी या ठिकाणी अमर उपोषणास बसणार आणी या उपोषणात काही अघटित प्रकार झाल्यास याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे या शेतकर्यांनी सांगितले भुमी न्युज शी बोलतांना सांगीतले

Previous articleकोवळ्या भारता…!!
Next articleप्रामाणिकपणे केलेले काम आपली आणि संस्थेची वेगळी ओळख निर्माण करून देते :