मारोती अक्कलवाड सवनेकर जिल्हा संपादक – नांदेड दिनांक – 20 एप्रिल 2022
“राजा तुपाशी अन् जनता उपाशी”
हिमायतनगर तालुक्यातील नव्हे तर संबंध जिल्ह्यात सध्या एकच चर्चेला उधाण आले आहे. लोडशेडींग… लोडशेडींग….. आजपर्यंत महावितरण कंपनीने प्रत्येक तालुक्यातील खेडेगावात एक याप्रमाणे तांत्रीक कामगार ठेवून, थातुरमातुर लाईटची आम्ही दुरुस्ती करुन, वेळेवर कशी तुम्हाला (ग्राहकांना) विज उपलब्ध करून देत आहोत यांचा कांगावा करणा-या महावितरण कंपनीने ऐन उन्हाळ्यात लोडशेडींग ठेवून ग्राहकांना अंधारात ठेवले.
वेळेवर महिनेवारी बिलं भरुनही शेवटी कामगार, कष्टकरी, शेतकरी यांच्या नशिबाला लोंडशडीग सत्र ठेवून सामान्य जनतेच्या वेठीस धरणाऱ्या या त्रीशंकु सरकारला आणि महावितरण कंपनीच्या नावाने लोक बोटे मोडत आहेत.
मागील पाच वर्षात एकदिवस पण लाईट गेली नाही. असे महिनेवारी बिलं भरणारे विजग्राहक आवर्जून सांगत आहेत.
महावितरण, विद्युत पारेषण कंपनी आणि त्रीशंकु सरकारने उपाययोजना करुन उन्हाळ्याच्या दिवसात लोडशेडींग पासुन मुक्त महाराष्ट्र घडवावा अशी जनतेची मागणी आहे.