Home Breaking News नाशिक जिल्हाधिकारी यांना पुण्यश्लोक फाउंडेशन चे तत्काळ कठोर कार्यवाही करण्याबाबत निवेदन

नाशिक जिल्हाधिकारी यांना पुण्यश्लोक फाउंडेशन चे तत्काळ कठोर कार्यवाही करण्याबाबत निवेदन

हेमंत शिंदे – नासिक जिल्हा संपादक भूमीराजा

किर्तनकार हभप. महेंद्र महाराज मस्के यांना काही संभाजी ब्रिगेड च्या समाजकंटक कार्यकर्तानी महाराज समाजाचे प्रबोधन करतात, हे सहन न झाल्याने काही खोटे नाटे आरोप करुन मारहान केली. त्या समाजकंटकांवर तातडीने अटक करण्यात येऊन कठोर कार्यावाही करण्यात यावी या मागणी करीता नासिक जिल्हाधिकारी यांच्याकड़े निवेदना द्वारे मागणी करण्यात आली आहे.
हभप. महेंद्र महाराज मस्के, हिंगोली यांना संभाजी ब्रिगेडचे सतीश जाधव, नितिन भोसले यांच्या सह इतर समाजकंटकांनी जाणीवपूर्वक सुडबुद्धिने महाराजांची बदनामी होईल हया कुटील हेतुने खोटे नाटे आरोप करुन मारहान केली व त्याचा वीडियो बनहुन सोशल मिडियावर टाकून महाराजांची बदनामी करण्यात आली.
समाज प्रबोधन करणाऱ्या एका कीर्तनकार महाराजाना याचा मोठा मानसिक धक्का बसला आहे, व समाज मनावर याचा मोठा आघात झाला आहे.
या घटनेचा नासिकजिल्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने तीव्र धिक्कार करण्यात आला असून मारहान करणाऱ्याना त्वरित अटक करुन कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नासिक जिल्हाधिकारी यांच्याकड़े निवेदना द्वारे करण्यात आली.
यावेळी समाधान बागल, संदीप देवकात, श्याम गोसावी, सोमनाथ गायकवाड़, निलेश ता सकर, सचिन श्रीरामे, सुभाष नप्ते, प्रदीप हाके, सचिन देवकाते सह अनेक जण उपस्थित होते.

Previous articleटरबुजचा मळा पाहुन येणा-या तीन व्यापा-यांना अँब्युलन्सने उडविले; दोन ठार एक गंभीर जख्मी
Next articleमहावितरणची लोडशेडींग आणि सामान्य जनतेचं मरण….