हिमायतनगर तालुक्यातील सरसम बु.गावाजवळ घडली दुर्घटना
अंगद सुरोशे भुमीराजा न्युज ता. प्रतिनीधी
हिमायतनगर| टरबुज मळा पाहुन मोटारा सायकलवर परत हदगांव शहराकडे येणा-या तीन व्यापा-याना भरधाव वेगात येणा-या अँब्युलन्सने जोरदार धडक देवुन उडविले आहे. यापैकी दोन व्यापारी जागीच ठार झाले असून, एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहीती मिळाली आहे.
हा दुर्दैवी आपघात हिमायनगर तालुक्यातील सरसम बु. या गावाजवळ दि. १८ एप्रिलच्या राञी ९ वाजेच्या सुमारास घडला आहे. हे तीन व्यापारी हदगाव शहरातील एकाच प्रभागातील रहवाशी आहेत. या बाबतीत मिळालेली माहीती अशी की, शहरातील आयुब शेख युसुफ, सुभान शेख इस्माईल व अलीम शे.बिलाल हे मोटार सायकलवरुन हिमायतनगर तालुक्यात टरबुज मळा पाहण्यासाठी आपल्या दुचाकीवरून आले होते. मला पाहणी करून हदगाव शहराकडे येत असतांना भरधाव वेगाने येणा-या अँब्युलन्सने त्यांच्या दुचाकीला उडविले. त्यामुळे दुचाकी उडून दूरवर पडल्यामुळे दोघाचा मृत्य झाला.
तर आलिम शे.बिलाल हा गंभीररित्या जखमी झाला असुन, त्यांची प्रकृति चिंताजनक असल्याची माहीती मिळाली आहे. या घटनेची माहीती मिळताच तिथल्या ग्रामस्थानी पोलिसांना कळविले असता पोलिसांनी दुसरी अब्युलन्स बोलावुन जख्मीना नादेंडला उपचारासाठी पाठविले. या अपघात प्रकरणी अँब्युलन्सच्या ड्रायव्हरच्या विरोधात पोलीसांनी हिमायनगर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोद केला आसल्याची माहीती मिळाली आहे.
अँब्युलन्सचा ड्रायव्हर नशेत..?
या झालेल्या दुर्दैवी आपघात ज्या अँब्युलसने झाला तो ड्रायव्हर नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या रोडवर किमान राञीच्या वेळी तरी पोलिसांची गस्त असणे आवश्यक आहे. पण पोलिसही याबाबतीत कानाडोळा करत असल्याने केवळ झालेल्या घटना नोद करायावची एवढे काम करून कर्तव्यात कसुर करत असल्याचं बोलले जात आहे. या बाबतीत वरिष्ठ पोलिस अधिकारी पण भरधाव वाहण चालविणा-याबद्दल का..? कारवाई करित नाहीत. जर नव्या वाहन कायदाच्या बाबतीत ही जनजागृती झाली तर बरेच आपघात सारख्या घटना कमी होऊ शकतात. पण पोलिस विभाग, परिवहन विभागाकडे या करिता वेळ कुठं आहे. अश्या संतप्त नागरिकांच्या प्रतिक्रिया ऐकवायास मिळत आहे.