Home Breaking News तालुका स्तरीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन.

तालुका स्तरीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन.

तालुका स्तरीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन.

मारोती अक्कलवाड सवनेकर
जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड
दिनांक – 19 एप्रिल 2022
आरोग्यनम धनसंपदा
सर्व तालुक्यातील जनतेला आरोग्याच्या सुविधा मोफत मिळाल्यात, या उद्देशाने ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर येथे तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थित आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक तालुक्यांचे विद्यमान आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकप्रिय खासदार हेमंत पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
या मोफत आरोग्य मेळाव्याला डॉ. हेमंतकुमार बोरसे उपसंचालक आरोग्य सेवा लातुर, डॉ.निळकंठ भोसीकर जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय नांदेड, डॉ. बालाजी शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी, मयुरकुमार आंदेलवाड गटविकास अधिकारी पं.स. हिमायतनगर, उमेश मुदखेडे, डॉ. डी. डी. गायकवाड वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर, डॉ
संदेश पोहरे तालुका आरोग्य अधिकारी, हिमायतनगर, डॉ. दामोदर राठोड वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आ. केंद्र चिंचोली आदि उपस्थित राहणार आहेत.
या मोफत आरोग्य मेळाव्याची वैशिष्ट्य आरोग्य मेळाव्याचे भिषक , बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, कान नाही घसा तज्ञ , दंतशल्य चिकित्सक तज्ञ, त्वचा रोग तज्ञ, या तज्ञांच्या सेवा उपलब्ध राहणार आहेत. तसेच आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, वेलनेस अॅकटिवहीटी, योगा, मेडीशन( ध्यान), याबद्दल समुपदेशन केले जाईल. तसेच डिजीटल आरोग्य आयडी, एन.सी.डी. सक्रीनिंग, मधुमेह उच्च रक्तदाब, मौखिक कर्करोग आदि रोगाचे निदान केले जाणार आहेत. आयुष्यामान भारत कार्ड, विविध प्रकारांच्या रक्त, लघवी करुन निदान व औषधोपचार मोफत करण्यात येणार आहे. सर्व गरजु रुग्णांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन डॉ. डि.डि.गायकवाड वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर यांनी केले आहे.

Previous article
Next articleटरबुजचा मळा पाहुन येणा-या तीन व्यापा-यांना अँब्युलन्सने उडविले; दोन ठार एक गंभीर जख्मी