सवना ज, रमनवाडी,चिंचोर्डी पांदन रस्त्याचे काम 30एप्रिल पर्यंत सुरु नाही झाल्यास हिमायतनगर तहसिल कार्यालय येथे उपोषणाला बसणार…मारोती अक्कलवाड
अंगद सुरोशे हिमायतनगर /प्रतिनीधी हिमातनगर हदगाव मतदार संघाचे लोकप्रतिनिधी माधवराव पाटील जळगावकर यांनी तालुक्यातील अनेक गावात पांदन रस्त्याच्या कामाचे मंजुरी लेटर प्रशासकिय मान्यता मिळवून दिल्या पण अनेक ठिकाणी आध्याप पांदन रस्त्याचे काम प्रलंबित असल्याने शेतकरी अडचणीत आले आसल्याचे शेतकरी यांच्या कडुन बोलल्या जात आहे सवना रमनवाडी चिंचोर्डी येथील शेतकरी यांनी लोकवर्गणीतून अंदाजे दोन लक्ष रुपये खर्च करुन मातीचे काम केले परंतु आध्याप कामाला गती मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे तरी या पांदन रस्त्याच्या कामाला 30 एप्रिल पर्यंत सुरवात नाही केल्यास सवना, चिंचोर्डी, रमनवाडी, येथील शेतकर्यांना सोबत घेऊन तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात आमरण उपोषणाचा इशारा येथील मारोती अक्कलवाड पाटिल सवनेकर जिल्हा संपादक भुमीराजा न्युज, ता. अ. कृषी संघटना, पेरकेवाड समाज सुधारक संघटना ता. सचिव, ग्रां. पं. सदस्य सवना यांनी दिला