हेमंत शिंदे – नासिक जिल्हा संपादक भूमिराजा
इस्माच्या कायदेशीर समितीच्या सह अध्यक्षा तसेच पुणे जिल्हा परिषद सदस्या, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
अंकिता पाटील यांनी केलेल्या सामाजिक कार्याची द खल घेत हा पुरस्कार जाहीर झाला आहे. शनिवार (16एप्रिल)रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे प्रदान करण्यात आला आहे.
एक अतिशय कर्तबगार, जगप्रसिद्ध राज्यकर्ती, हिन्दू धर्माला उर्जीतावस्था प्राप्त करुन देणारी, दानशूर, धार्मिक शासनकर्ती महिला राज्यकर्ती म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव इतिहासात सुवर्णक्षराणी लिहिले जाहून अजरामर झाले आहे. त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार अंकिता पाटील ठाकरे यांना प्राप्त झाला असून या पुरस्काराने अजून उमेदीने काम करण्याची प्रेरणा व एक जबाबदारी प्राप्त झाली आहे अशी भावना त्यांनी मनोगतातुन बोलून दाखवली. या पुरस्कारासाठी सागा फाउंडेशन व त्यांच्या सर्व सहकारी यांचे त्यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे भोसले व सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.