सुरोशे भुमीराजा न्युज ता.प्रतिनीधी/हिमायतनगर तालुक्यातील कारला गावात बऱ्याच दिवसा पासुन विजेचा लपंडाव सुरु होता अनेक निवेदने देऊन सुद्धा वरिष्ठ अधिकारी अभियंता याकडे दुर्लक्ष करत होते परंतु कारला गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत. हे बाब लक्षात येताच कारला येथील तंटामुक्ती अध्यक्ष डाॅ. गफार साहेब व सरपंच गजानन पाटील कदम यांनी पुढाकार घेऊन रात्री 10वाजता आ. माधवराव पाटील जळगावकर यांना संपर्क करून घडलेला प्रकार साहेबांना सांगीतला आ. साहेबांनी अभियंता लोणे यांच्याशी संपर्क करताच अभियंता सह कर्मचारी यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणताही विलंब न करता अभियंता लोणे यांनी आपली यंत्रना सुरु करुन कारला येथील नागरीकांना सिंगल फेज डि. पी उपलब्ध करुन विज सुरु करुन दिली यावेळी उपस्थित नागरीक…. विठ्ठल आचमवाड धम्मपाल वाठोरे, शिवाजी राऊतवाड, मारोती कदम, संजय मोरे, जिवन रावते, दिपक वाघमारे लाईनमन साहेब गणेश नरवाडे यांनी सहकार्य केले.