आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी श्री बजरंगबली हनुमानास घातले साकडे
हिमायतनगर,/.. कृष्णा राठोड| हे हनुमंतराया माझ्या सर्व जनतेला सुखी समृद्ध ठेव… दीर्घायुष्यासह आर्थिक संकटातून मुक्ती दे…. देशात कायम शांतता राहो… यंदाचा खरीप हंगाम भरभराटी देणारा ठरो….अश्या शब्दात हदगाव -हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी श्री बजरंगबली हनुमानास साकडे घातले. त्यांनी प्रथमतः विदर्भ – तेलंगाना – कर्नाटक – मराठवाड्यातील ग्रामीण भागात प्रसीध्द असलेल्या बोरगडी येथील मारोती मंदिरात संकटमोचन श्री हनुमान जयंतीचे औचित्य साधून सकाळी ४.३० वाजता उपस्थित होऊन दर्शन घेतलं. सकाळी ४.३० वाजता पुरोहित कांता गुरु वाळके यांच्या मधुर वाणीत हनुमंतरायचा जन्मोत्सव सोहळा अभिषेक – महारातीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी जय हनुमान.. जय श्रीराम…. बजरंग बली की जय… पवनसुत हनुमान की जय.. च्या जयघोषात भक्तांनी नारळ फोडुन श्रीचे दर्शन घेतले. दुष्काळी परिस्थिती व पाणी टंचाईच्या गर्तेतही दर्शनासाठी हजारो श्रध्दाळु भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. हनुमान जन्मोत्सव निमित्ताने हभप गणेश महाराज कोल्हारीकर यांचे कीर्तन संपन्न झाले. यावेळी बोलताना आ.जवळगावकर म्हणाले कि, यंदा कितीतरी वर्षाने हनऊमन जयंती आणि तीही शनिवारी आली… या दिनी आम्हाच्या सर्वाना दर्शन झाले हे मोठं भाग्य आहे. दोन वर्षांपासून कोरोगामुळे कुणालाही दर्शन घेता आले नाही तसेच विठू माऊलीच्या वारीतही जात आले नाही. यंदा शासनाने सर्व निर्बंध उठविले त्यामुळे हनुमंतरायचा उत्सव आनंदाने साजरा होतो आहे, त्याचा प्रमाणे वारीची दिंदीही मोठ्या जलौषात निघणार आहे.
गेल्या दोन वर्षात काही विकास कामे करायचे असले तरी करता आले नाही… यंदा मात्र हिमायतनगर – बोरगाडीच्या रस्त्यासाठी जवळपास ५ कोटी रुपयाचा निधू मंजूर करून आणलं आहे. हे सर्व काही हनुमंतरायाच्या कृपेने आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाले आहे. यासह आणखी जे जे काही करता येईल ते मी मारोतीरायाच्या साक्षीने आणि आशीर्वादाने नक्कीच करणार असे सांगून आ.जवळगावकरांनी येथे दर्शनासाठी उपस्थित झालेल्या सर्व भाविक भक्ताना हनुमान जयंतीच्या मनापासून शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त उपस्थित झाले होते. यावेळी माधव महाराज बोरगडीकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय माने, रामराव पाटील कार्लेकर, मारोती मंदिर कमिटीचे सर्व सदस्य, गावकरी, नागरिक, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.