Home Breaking News डाॅ. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी दहा लाखाचा निधी. 👉 आमदार...

डाॅ. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी दहा लाखाचा निधी. 👉 आमदार मोहनराव हंबर्डे

मारोती अक्कलवाड
जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड

दिनांक-14 जानेवारी 2022

विश्वरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चौदा एप्रिल रोजी जयंती संपुर्ण देशात नव्हे, तर जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे.
तेरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजता मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
अगोदर सर्व मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, स्ट्रीट लाईट चे उद्घाटन करण्यात आले. आयोजित कार्यक्रमात आमदार मोहनराव हंबर्डे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, माझ्या स्थानिक निधीतुन पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी दहा लाखाचा निधी दिला आहे. यामध्ये दोन्ही बाजूला कमान, वर जाण्यासाठी पाय-या व ईतर आवश्यक कामाचा समावेश आहे. असे त्यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र काॅग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा विधानपरिषद सदस्य आमदार अमरभाऊ राजुरकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पाठीमागच्या बाजूला जिएसटी चे कार्यालय आहे. ते कार्यालय नविन कौठा येथे हलवुन येथील पुर्ण जागा बाबासाहेब यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी देण्याचा माणस आहे. असेही ते म्हणाले. माजी खासदार तथा माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर आदिंची समायोजित भाषणे झाली. यावेळी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, महापोर जयश्री ताई फावडे, महापालिका आयुक्त लहाने, सर्व नगरसेवक, कार्यकर्ते, नागरीक आणि सर्व पत्रकार बांधवा उपस्थित होते.
पुतळ्याचा सर्व आजुबाजुचा परिसर आणि आकाशात फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशाच्या गजरात, घोषणेने सारा परिसर दणाणून गेला होता.
कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Previous articleतालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हर्षउत्साहात साजरी.
Next articleहे हनुमंतराया माझ्या सर्व जनतेला सुखी समृद्ध ठेव दीर्घायुष्यासह आर्थिक संकटातून मुक्ती दे …