Home Breaking News कदमापूर येथे मासिक पाळी विषयी कार्यशाळा संपन्न

कदमापूर येथे मासिक पाळी विषयी कार्यशाळा संपन्न

यशस्वी बहुउद्देशीय सामाजिक संस्था , कदमापूर मार्फत महात्मा ज्योतिबा फुले जयंती दिनी कदमापूर ता. खामगाव येथे मासिक पाळी ,स्वच्छता व आरोग्य विषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.शिल्पा दिर्घायु इंगळे ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्ष सौ. संजना अमरदीप इंगळे, कदमापूर ग्रामपंचायत माजी सरपंच तथा आशा सेविका सौ संगीता इंगळे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून अनइनहीबीटेड या जागतिक स्तरावरील संस्थेचे फेलोशिप प्राप्त तसेच यशस्वी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक सचिव अमरदीप इंगळे होते. मासिक पाळी हा विषय केवळ महिलांपुरता मर्यादित नसून पुरुषांनीही यात सहभागी व्हायला हवे. असे प्रतिपादन अमरदीप इंगळे यांनी केले. कार्यशाळेमध्ये मासिक पाळी ,मासिक पाळीच्या वेळेस वापरायची साधने, स्वच्छता, गर्भधारणा व गर्भपात, आणि इतर लैंगिक समस्या, आजार व त्यावरील उपाय. याबाबत अमरदीप इंगळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला गावातील असंख्य महिला व किशोरवयीन मुलींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील महिलांनी मेहनत घेतली.

Previous articleसवना ज., रमणवाडी ते चिंचोरडी पांदण रस्त्याचे मजबुतीकरण पावसाळ्यापूर्वी पुर्ण करा…
Next articleसरसम येथे कुस्त्यांचा चित्तथरारक कार्यक्रम संपन्न!