ज्योतिबा ची शाळा
ज्योतीबांनी शाळा काढली
गल्ली ते दिल्ली ला
खेड्याला पांड्याला
तालुका जिल्ह्याला
मुलीची पहिली शाळा
पुण्याला काढली
शिक्षण देण्यासाठी माझी
माय पुढे धावली
किती कष्ट सहन केले
शिकविले मुलीला बाई
सावित्री मातेने मला
धडा शिकविला बाई
मुलीच्या शिक्षणाला
हसल्या गडद आहे दिशा
माय तुझ्या कर्तव्याने
बोलती झाली उषा
शिक्षणाचा किनारा
मुलीच्या धन्य केला
डॉक्टर इंजिनियर मुली
शिक्षण घेते पुण्याला
मुलीचे शिकविते
शाळेला शाळेला बाई
आजच्या स्त्रीला
चंदनाचा गंध आला
सौ व्यंकन बाई विनविते
विनंती जगाला बाई
मुलीचे शिकवा ग
पाठवा शाळेला वाच वाचवा मुलीला
मुले मुली शिकवा ग
पाठवा शाळेला
मुलीचा जन्म देतील
माय माझ्या सावित्रीला
माय जिजाऊ ला
अहिल्या कौशल्याला
झाशीच्या राणीला
माय रमाई ला बाई
राम राजे शिवराजे
येईल घराला बाई
राम राजे शिवराजे
भारत देशाला
सौ व्यंकन बाई परशुराम चेनलवाड
विश्वनाथ कॉलनी वसमत,परभणी