Home कविता “एप्रिल फुल”

“एप्रिल फुल”

रूप ना रंग
गंध ना भूल.
एप्रिल मासात रुजे
आगळे वेगळे फुल.

ना अस्तित्व ना-
कसलीच माती.
मूर्ख बनवायची
फक्त आहे गती.

पहिल्याच दिवशी
लागते चाहूल.
मूर्ख-मूर्ख खेळामध्ये
पडते मग पाऊल.

साऱ्यांचाच प्रयत्न
चाले बनवायला वेडं.
एप्रिलच का म्हणून
सुटलं नाही कोडं ?

“एप्रिल फुल” म्हणून
चाले फसवा फसवी.
फसगत झाल्यावर मग
चाले हसवा हसवी.

कल्पना देवळेकर म्हापूसकर

Previous articleजनतेनी विकासकामात सहकार्य करावे मतदारसंघात विकासनिधी कमी पडु देनार नाही—
Next articleब्रम्हाध्वज मांगल्याचा