Home महाराष्ट्र चांदवड़च्या होळकर वाड़यासाठी राज्य सरकारकडून पाच कोटी मंजूर

चांदवड़च्या होळकर वाड़यासाठी राज्य सरकारकडून पाच कोटी मंजूर

हेमंत शिंदे  नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा 

सहयाद्रीच्या पर्वतरांगेत वसलेल्या मुंबई – आग्रा महामार्ग वरील चांदवड़ येथील होळकर कालीन स्थापत्य कलेचा आविष्कार असलेल्या होळकर वाड़ा म्हणजेचच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या रंगमहालाला गतववैभव प्राप्त करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पर्यंटन विकास योजने अंतर्गत पाच कोटी रुपये निधी मंजूर करुन तसे आदेश नाशिक जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
होळकर वाड़ा पुरातत्व खात्याच्या आधिपत्याखाली असून दुरुस्ती कारणास्थव पर्यंटकांनसाठी सध्या बंद आहे. पर्यंटनमंत्री आदित्य ठाकरे व राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी पाच कोटी रुपये निधी दिल्यामुळे दुरुस्तीचे काम लवकरच पूर्ण होऊन नेत्रदिपक असा रंगमहल होळकरप्रेमी व पर्यंटकाना पहण्या साठी खुला होणार असल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंत्री छगनराव भुजबळ यांनी 2009 ते 2014 या काळात रंगमहलाच्या पुनर्विकासासाठी 15 कोटी रूपये मंजूर केले होते. याच महिन्यात 20 मार्च रोजी नासिक च्या कालिदास कलामंदिर मध्ये पुण्यश्लोक फाउंडेशन च्या वतीने युगपुरुष मल्हारराव होळकर जन्मोंत्सव व दत्तात्रय भरणे यांचा नागरी सत्कार सोहळा कार्यक्रमात पालकमंत्री भुजबळ व राज्यमंत्री भरणे यांच्याकड़े चांदवड येथील रंगमहलाचे नूतनीकरनाची मा गणी करण्यात आली होती, त्याच वेळी त्यांनी जातीने लक्ष घालून काम करण्याची ग्वाही दिली होती.

Previous articleवाशी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी गुलाब राठोड तर उपचेअरमनपदी मारोती खूपसे यांची निवड
Next articleजनतेनी विकासकामात सहकार्य करावे मतदारसंघात विकासनिधी कमी पडु देनार नाही—