Home Breaking News स्व.राजीव गांधी रुग्णालय येरवडा परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी मिळालेलं वरदान आहे

स्व.राजीव गांधी रुग्णालय येरवडा परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी मिळालेलं वरदान आहे

आमचे प्रतिनिधी यांचा एक अनुभव

पुणे- माझ्या तीन वर्षांची मुलगी रात्री जुलाब, खोकला आणि तापाने ग्रस्त झाली होती. रात्र कशीबशी काढली आणि सकाळी मुलीला घेऊन स्व.राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये घेऊन घेलो. गर्दी नसल्याने १० रुपये पुढे करत केस पेपर सहज मिळवता आला

लहान मुलांच्या ओपीडी बाहेर माझ्या अगोदर दोन महिला आपल्या बाळांना घेऊन बसलेल्या होत्या. आमचा नंबर आला. आतमध्ये दोन बालरोगतज्ज्ञ बसलेले होते. आम्ही नमस्कार डॉ. साहेब म्हणून जवळ गेलो. डॉक्टर ने बाळाला काय होतंय याची संपूर्ण माहिती घेतली. वजन करायला सांगितलं आणि केस पेपर वर औषधे लिहून दिली

बाहेर येऊन औषध कक्षा समोर आलो. औषधे लिहून दिलेला केस पेपर पुढे केला. एक औषध सोडून सर्व औषधे मिळाली. खोकला आणि तापाचे पातळ औषध खुले असल्याने सोबत मोकळ्या औषधांच्या बाटली सोबत आणायच्या असतात याबाबत माहिती नसल्याने मोकळ्या बाटली मिळवण्यासाठी धावपळ झाली. हॉस्पिटलच्या महिला सेक्युरिटी यांनी बाटली उपलब्ध करून दिल्या

सरकारी हॉस्पिटल, ठेवण्यात आलेली सुदंर स्वच्छता, डॉक्टरांची मिळालेली सुदंर ट्रीटमेंट आणि हॉस्पिटल चा स्टाफ यांच्याकडून मिळालेल सहकार्य सर्वंच अप्रतिम..

सरकारी स्व.राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये १० रुपयांत मिळणारं उपचार म्हणजे सर्व सामान्यांना मिळालेला वरदान चं म्हणावं लागेल.. धन्यवाद

योगेश घायवट

Previous articleहुजपाच्या रासेयो शिबिरार्थींना शिवार फेरीतुन मिळाले आधुनिक शेतीचे ज्ञान
Next articleलोहारा येथील नागरिकांचे पाण्यासाठी हाहाकार