Home कृषीजागर हुजपाच्या रासेयो शिबिरार्थींना शिवार फेरीतुन मिळाले आधुनिक शेतीचे ज्ञान

हुजपाच्या रासेयो शिबिरार्थींना शिवार फेरीतुन मिळाले आधुनिक शेतीचे ज्ञान

जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड
दिनांक – 30 मार्च 2022

येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराच्या सहाव्या दिवशी सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांकडून परिश्रम करून घेतले व ठीक नऊ वाजता करंजी येथील प्रगत व आधुनिक शेतकरी संजय चाभरेकर यांच्या शेतावर जाऊन वेगवेगळ्या पिकाचे केलेले आधुनिक उत्कृष्ट शेततळ्याच्या माध्यमातून विकासासाठी केलेले नियोजन पाहून विद्यार्थ्यांना आगळावेगळा अनुभव आला. त्याठिकाणी प्रगत शेतकरी संजय चाभरेकर यांनी छोटेखानी कार्यक्रम घेऊन रासेयो प्रशिक्षणार्थीचे स्वागत केलं. या ठिकाणी शिबिरार्थींना मार्गदर्शन करण्यासाठी श्री मारुतराव काळे साहेब कृषी सहाय्यक तसेच शेळके साहेब कृषी सहाय्यक आणि सौ. बेहरे ताई कृषी सहाय्यक यांनी उपस्थित राहून मोलाचे मार्गदर्शन केले. या ठिकाणी रासेयो चे कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे व सहकार्यक्रमाधिकारी डॉ. एल.बी. डोंगरे सर उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले कृषी सहाय्यक मारोतराव काळे साहेबांनी शेतकऱ्यांसाठी असलेल्या शेती उपयुक्त शेतीसाठी लागणारे अवजारे आणि असलेल्या विविध योजनांची सखोल माहिती दिली. या साठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. तसेच उपस्थित असलेले दुसरे मार्गदर्शक कृषी सहाय्यक शेळके  यांनी सुद्धा आधुनिक शेतीत आधुनिक टरबूज याविषयीचे व खास करून हळदी पिकासाठीच्या लागवडीची माहिती दिली. त्यांनी किटक नाशकांविषयी सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली गेली. तसेच तिसरे कृषी सहाय्यक असलेल्या सौ. बेहरे ताई यांनीसुद्धा महिला बचत गटासाठी लागणाऱ्या विविध बाबींची सविस्तर माहिती दिली. यानंतर प्रगत असलेल्या शेतकरी संजय चाभरेकर त्याने अतिशय उत्कृष्टरित्या आपण केलेल्या आधुनिक शेतीचे नियोजनातून व त्यातून घेतलेले पिके आणि लागलेला खर्च याविषयीचे सखोल मार्गदर्शन करुन इतरांना आधुनिक शेती करण्याचा मोलाचा सल्ला देऊन विद्यार्थ्यांना सांगितले की ती तुम्ही तुमच्या आई वडिलांना यासंदर्भात बोला. आणि आधुनिक शेतीकडे वळावा हा संदेश दिला. तसेच या ठिकाणी असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्टॉफ सेक्रेटरी डॉ. डि. के. कदम यांनी आपल्या शेतीविषयक सखोल ज्ञानातून शेतीसाठी लागणाऱ्या सर्व बाबींची माहिती दिली. आणि कार्यक्रमाचे उपस्थित असलेले वरील सर्व मान्यवरांच्या भाषणातील मुद्यांना सविस्तरपणे मांडून सांगितले की प्रगतीशिल शेतकरी संजय चाभरेकर यांच्या प्रमाणे आपण सुद्धा आधुनिक शेती करु शकतो. असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिवानी चाभरेकर यांनी केले. तर आभार डॉ. डी. के. मगर यांनी केले. या प्रसंगी करंजी येथील प्रमुख शेतकरी उपस्थित होते.
या नंतर दुपारच्या बौद्धिक सत्रात मराठी विभागाचे प्रमुख डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी अरे पुन्हा पेटवा आयुष्याच्या मशाली या विषयावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात संदर्भ देऊन राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना स्वंयसेवेची जाणीव करून दिली. तसेच या सत्राचे असलेले दुसरे मार्गदर्शक मराठी विभागाचे डॉ. लक्ष्मण पवार यांनी भारतीय समाज व अंधश्रद्धा या विषयी निवडक ग्रंथांचा संदर्भ देऊन अत्यंत मोजक्या शब्दात अभ्यासपूर्ण विषयाची मांडणी केली. व या सत्राचे असलेले तिसरे पर्यावरण शास्त्राचे प्रमुख प्रा. आशिष दिवडे यांनी पर्यावरण संवर्धनात स्त्रीयांची भूमिका या संदर्भात आपले मनोगत व्यक्त करताना अनेक विज्ञाननिष्ठ भारतीय हिंदू संस्कृतीतील अनेक सणांचा संबंध विज्ञान व पर्यावरणाचशी जोडण्याचा प्रयत्न केला. या सत्राचे अध्यक्षीयस्थान भूषवणाऱ्या प्राणीशास्त्राच्या प्रा. डॉ. सविता बोंढारे यांनी या सत्राचे अध्यक्षीय समारोप करत असताना त्यांनी प्रमुख मान्यवरांच्या भाषणातील मतितार्थ कमी शब्दात व मोजक्या मुद्यात व समर्पक रीतीने मांडून कार्यक्रमाचा समारोप केला.
सूत्रसंचालन महात्मा गांधी ग्रुपचा विद्यार्थी व्यंकटेश यशवंतकर यांनी केले तर आभार सोनाली चिट्टेवार यांनी केले. दिवसभरातील दोन्ही सत्राला उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्रा. डॉ. डी. के. माने, डॉ. वसंत कदम, डॉ. श्याम इंगळे, प्रा. प्रवीण सावंत, प्रा. महेश वाकडकर, डॉ. शेख शहेनाज, डॉ. डी. सी. देशमुख आदी उपस्थित होते. तसेच ज्यांच्यासाठी या शिबिराचं आयोजन केलं ते प्रशिक्षणार्थी यांनी दोन्ही सतराचा भरपूर लाभ घेतला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Previous articleअखेर विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण
Next articleस्व.राजीव गांधी रुग्णालय येरवडा परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी मिळालेलं वरदान आहे