जिल्हाधिकारी व ग्रामपंचायतकडे दिला होता उपोषणाचा इशारा
योगेश घायवट वाडेगाव.
बाळापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वाडेगाव येथिल नागरीकांच्या न्याय हक्काच्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयासमोर २८ मार्च सोमवार पासून जगदीश अवचार हे आमरण उपोषणास प्रारंभ करण्यात आला आहे.
वाडेगाव येथील जगदीश रामकृष्ण अवचार यांनी वारंवार संबधित विविध विभागाकडे निवेदनातून मागणी करूनही उपयोग होत नसल्याने शेवटी आमरण उपोषणास सुरवात केली आहे . अवचार यांनी ग्रामप्रशासन कडे दिलेल्या लेखी निवेदन मध्ये अशोक नगर लगत स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पूल बांधणे, नदीच्या पात्रातील तसेच गावातील वाहुन येत असलेल्या सांडपाण्याचा निचरा करने, दलीत वस्तीचे सार्वजनिक कामे करून ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेणे . भुयारी नाली बांधकाम करून मुख्य नालीस जोडुन देणे साठी युद्ध पातळीवर समस्या निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील राहणे. आदी समस्या बाबत सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे.हे उपोषण किती यशस्वी होईल याकडे सर्व गावतील ग्राम्सथाचे लक्ष लागले आहे.