Home Breaking News रस्त्यावर पडल्याने गिट्टीने अपघातास आमंत्रण….

रस्त्यावर पडल्याने गिट्टीने अपघातास आमंत्रण….

अपघात घडल्यास बघू रुद्रानी कंपनीचा व्यवस्थापक

हिमायतनगर प्रतिनिधी :- कृष्णा राठोड

रस्ते हे कोणत्याही देशाच्या प्रगतीकरिता महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात यामुळे भारत देश सुध्दा मागे राहता कामा नये म्हणून केंद्र सरकारने पक्के रस्ते बनवून देशातील नागरीकांना दळणवळणाच्या सोईचे रस्ते बनवण्याच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल आहे. परंतु केंद्र सरकारच्या या महत्वकांक्षी निर्णयाला रस्त्याचे कामे करत असलेल्या कंत्राटदारांनी रस्ते धाब्यावर बसवण्याच काम करत असल्याचे दिसून येत आहे.
सर्व देशभर रस्त्याचे सिमेंट काँक्रेटीकरणाच्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून यामुळे भारत सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यांत काम पूर्ण करण्यात येत आहे. परंतु या रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारांकडून मात्र सरकारची आणि सर्वसामान्य जनतेची डोकेदुखी वाढत आहेत, तेंव्हा यांना वेळीच आवर घालण्यासाठी शासनाने पावबंद घालावा असे नागरिकांतून बोलले जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे नांदेड जिल्ह्यातील हदगाव –
हिमायतनगर या दोन तालुक्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्गाचे काम रुद्रानी कंपनी मार्फत करण्यात येत आहे परंतु अनेक नियमांना बगल देऊन या भागातील लोकांना कसा त्रास देऊन काम करता येईल यांचा चंग कंपनीने बांधलेला दिसून येत आहे. विशेष म्हणजे हा रस्ता या तालुक्याचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर आणि माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांच्या मूळ गावावरून जात आहे तरी कंपनीस याचे महत्त्व नसल्याचे लक्षात येते.. मागे हिमायतनगर येथील दुसऱ्या कंपनीने तर चक्क लोकप्रतिनिधी यांना रस्त्यावर येऊन आंदोलन करण्यास भाग पाडले होते… जर शासनाने काम करणाऱ्या कंत्राटदार या भागाच्या आमदार यांना जुमानत नसतील तर सामान्य माणसाला काय विचारतील ही कल्पना न केलेलीच बरी…
तरीही या कंपनीचे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही अशी धारणा असल्यामुळे जवळगाव ते आष्टी मार्गे तामसा या रस्त्याने ओहरलोड गिटीची वाहतूक करत असल्याने सर्व रस्त्याने गिट पडल्याने दुचाकी वाहने आणि चारचाकी वाहनांनी प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कारण यामुळे अनेक वाहने रस्त्यावरून घसरत आहेत. याच प्रकारे अशी वाहतूक असेल तर नक्कीच मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. परंतु कमी वेळात जास्त ट्रीप न करता मर्यादेपेक्षा अधिक वाहतूक करून जास्त नफा मिळाला पाहिजे या हेतूने वाहतूक नियमांची पायमल्ली करून लोकांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार त्वरित बंद करावा अन्य था कंपनीचे काम बंद पाडण्याचा निर्धार या भागातील प्रवाशी करत आहेत.


प्रतिक्रिया:-
व्यवस्थापक
“अपघात घडल्यास पाहू.”…

याबाबत आमच्या प्रतिनिधी यांनी पाच शिव हनुमान मंदिर येथील कंपनीच्या व्यवस्थापक यांच्या निदर्शनास ही बाब लक्षात आणून देत यात काही तोडगा काढावा अशी विनंती केली असता त्यांनी आवर्जून सांगितले की, एखाद्या वाहनाचा मागील फालका खराब झाला असेल त्यामुळे असा प्रकार घडला असावा परंतु याने कोणताही अपघात घडला का…?
घडल्यास नंतर पाहू अशी अशी प्रतिक्रिया दिली..


म्हणजे कंपनीच्या वतीने अवैध वाहतूक करणे काही वावगे नसणार. भविष्यात जर अपघात घडला तार त्यांचे पुढे काय करायचे ते नंतर पहायची तयारी करून ठेवली आहे परंतु या रस्त्यावर कोणताही अपघात घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे नसल्याचे त्यांनी दाखून दिले आहे.

Previous articleअपघातग्रस्त मुलाला वाळकेवाडी ग्रामस्थांचा मदतीचा हात…!
Next articleहिमायतनगर शहरातील आठवडी बाजाराची नियमानुसार हराशी होत नसल्याने 29 मार्च रोजी शिवसैनिक विठ्ठल ठाकरे यांचे आमरण उपोषण..