Home समाजकारण अपघातग्रस्त मुलाला वाळकेवाडी ग्रामस्थांचा मदतीचा हात…!

अपघातग्रस्त मुलाला वाळकेवाडी ग्रामस्थांचा मदतीचा हात…!

ग्रामस्थांनी गरीब कुटूंबियांतील मुलांना शस्त्रक्रियासाठी मदतीचा हात …

हिमायतनगर /..कृष्णा राठोड
एकाच कुटुंबातील दोघांसह, त्यांच्या आतेभावांचा असा चौघाचा भयानक अपघात झाला होता ,व तिघांनी जागीच जीव सोडला…

मागील काही दिवसापूर्वी वाळकेवाडी येथील एकाच दिवशी अत्येंंन्त गरीब घरातील प्रमुुख तीन युवकांचा अपघाता दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला होता…
या घटनेने वाळकेवाडीच नव्हे तर सर्व परिसरावर शोककळा पसरली होती…
सर्व ग्रामस्थांना अश्रु अनावर झाले होते..
त्या अपघातात एकाच घरातील दोन भावंडे होते त्यातील एका मोठया भावांचचे निधन झाले या निधनाने त्यांचे लहान लहान मुलं व पत्नी परकी झाली व दिव्यांगत असलेले आई सतत रडून रडून आजारी पडली…
मृत्यू पडलेल्या मुलाच्या  म्हाताऱ्या आईचे दुःख…
साहजिक आहे ना..!
त्यांचे दोनी मुलं लहान असतांनाच आपल्या पतीचे निधन झाले व ज्या दोन मुलाकडे पाहून मी जीवन जगत होतो त्यातील एक धाटका मुलगा दगावला व एक मुलगा ज्यांची पत्नी दिवस होऊन बाळांंपण  दोन दिवसावर आली तो दवाखान्यात मृत्यूची झुंज देत आहे…
आता त्यां मुलाची मोठी शस्त्रक्रिया करायची आहे घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची,राहायला घरं नाही, उदरनिर्वाह करण्यासाठी जमीन नाही, एवढे पैसे आणावे तरी कुठून, काय करावं काही समजेना आपण जीव सोडला तर माझे नातवंड खूपच परके होतील,या सर्व संकटात पडून ढसा ढसा रडत होती…
या सर्व गोष्टीनी भावनिक होऊन जो मुलगा नांदेड येथे उपचार घेत आहे व त्यांना शस्त्रक्रियाची गरज आहे त्यांना सहानुभूती म्हणून ग्रामस्थांनी प्रत्येक घरून 100रू,200रू,500रू, असे त्यांचे स्वखुशीने आर्थिक मदत करत आहे…
या मदतीने खरंच असे लक्षात येते कि , खेड्यापाड्यात आजही माणुसकी जिवंत आहे.

जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क साधा:-

कृष्णा राठोड
भूमीराजा तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
मो.९१४५०४३३८१

Previous articleकारला सोसायटीच्या चेअरमन पदी गंगाराम पाटील चव्हाण तर उपचेअरमन पदी संजय घोडगे ,यांची बिनविरोध निवड.
Next articleरस्त्यावर पडल्याने गिट्टीने अपघातास आमंत्रण….