Home कविता मोबाईल

मोबाईल

हातात नाही पैसा-पाणी
इथून तिथे ट्रान्सफर नाणी
घड्याळा विना दिसते वेळ
रेडिओ विना ऐकतो गाणी

गुगुलबाबा विश्वविद्यालय
चित्र-चरित्र, ज्ञान-भांडार,
बोटांवरची सर्कस न्यारी
त्या पोटात कॅलक्युलेटर

गप्पा-गोष्टी ऑनलाईन
पत्रपेटी झाली मॅसेंजर
संवाद, संपर्क क्षणोक्षणी
देश-विदेशीचे झाले मैतर

जगाचा कानाकोपरा, स्थळ
घटकेत रेल्वे-बस-एसटी वेळ
मोबाईल तुझ्यात सामावले
गाणी,बातम्या, tv, घड्याळ

*नुसत्या तुझ्या असण्याने*
हाती तिकीट, एक मिनिट
भटकंतीचा प्रवास सुलभ
मार्ग मोकळा मॅपचे गणित

दशभुजाधारी मोबाईल
वेळेची व श्रमाची बचत
स्थळ, काळ काही असो
मोबाईलमध्ये सारे व्यस्त

कल्पना देवळेकर मापुसकर
मिरारोड

Previous articleढगाळ वातावरणामुळे हळद उत्पादक शेतकरी संकटात.
Next articleचारोळी