Home कृषीजागर ढगाळ वातावरणामुळे हळद उत्पादक शेतकरी संकटात.

ढगाळ वातावरणामुळे हळद उत्पादक शेतकरी संकटात.

जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड.
दिनांक- 24 मार्च 2022

या वर्ष भरापासुन शेतकरयांना एक नाही तर अनेक संकटांचा सामना करावा लागतो आहे.
गेल्या आठवड्यापासून हळद काढणीच्या कामांना गती मिळाली आहे. परंतु सततच्या ढगाळ वातावरणामुळे पाऊस पडतोय की, काय? अशी चिंता शेतकऱ्यांच्या मनात सतावत आहे.
शेतकऱ्यांच पिवळ सोनं समजल्या जाणारे आणि मुख्य पिकं म्हणुन हळद या पिकांकड शेतकरी पाहतात. परंतु निसर्गाच्या लहरीपणा हा गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांच्या मुळांवर बसला आहे. असे जाणकार शेतकरी सांगतात.
हजारों रुपयांच्या ताडपत्री खरेदी करुन शेतकरी परेशान.

शेतकऱ्यांनी उघड्या आकाशाखाली हळद पिक वाळवणीसाठी ठेवले आहे.
पण, शेतातील हिंस्त्र प्राण्याची चिंता न करता शेतकरी आपल्या हळदिचया ढिगाजवळ आपली अल्पशी निद्रा घेत आहेत.
ना! सापाची चिंता. ना! जंगली जनावरांची. फक्त चिंता माझ्या हळदिची असे खडे बोल प्रगतशील शेतकरी तथा कृषि मित्र मारोती डाकोरे एकघरीकर यांनी आमच्या प्रतिनिधींना बोलुन दाखवले.

👉 खरीप 2021 चा पिक विमा कधी मिळणार?

लाखो रुपये शेतकऱ्यांचे भरुन घेऊन, शेतकऱ्यांची फसवणुक करणारी, ईफको टोकीयो पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.
उर्वरित पंचविस टक्के मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. म्हणुन रब्बी हंगामातील सर्व गहु, हरभरा, रब्बी ज्वारी चे पिक कापणी प्रयोग करून घेत आहेत.
मनमानी पद्धतीने जास्त धान्यांचे वजन घेतले आहे.
पण तालुक्यातील संबंधित पिक विमा प्रतिनिधी खरीप 2021 च्या पिक विमा निधीबाबत सावध पवित्रा घेत आहे.
जिल्हाचे संबंधित कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी या विषयावर बोलायला गिळुन गप्प बसले आहेत.
येत्या पंधरा दिवसांत शेतकऱ्यांचा खरीप पिकंविमा जमा नाही झाला तर, हिमायतनगर तालुका कृषी मित्र संघटना, शेतकऱ्यांच्या हितार्थ तहसील कार्यालय हिमायतनगर येथे उपोषणाला बसणार आहे. असा गर्भित इशारा शेतकरी संघटनेचे नेते, तालुका कृषी मित्र संघटनेचे उपाध्यक्ष संजय भाऊ चाभरेकर यांनी दिला आहे.

Previous articleमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची तालुका स्तरीय कार्यकारनी बैठक संपन्न!
Next articleमोबाईल