जात,धर्म,पंथ,वर्ण,वर्ग
कशाला ?भेदभाव तुकडी
माणसाने माणसासाठी
करू नये माणुसकी वाकडी
आधार म्हणून तिसरा पाय
घेतली होती सोबत काठी
भिरकावली जनमाणसात
फक्त वर्णभेद मिटवण्यासाठी
खंजीर,भाले, बंदूक,गोळ्या
होतो तणावपूर्ण जमाव
तनमनाच्या अणूरेणूत हवे
सलोखा,सामंजस्याचे गाव
रक्ताचा रंग एक….लाल
भूक तडफड ही समान
तरीही रुतून आहे अजुनी
मनात…धर्म-जातीचे बाण
सोडा आता बुरसटलेला
मी…तू…पणा अहंभाव
मनामनाच्या खोल तळाशी
रुजू द्या “सर्व-धर्म-समभाव”
कल्पना देवळेकर मापुसकर
मिरारोड,ठाणे